भोपाळ – मध्य प्रदेशात आगामी काळात बाजारपेठ २४ तास सुरूच राहणार आहे. त्यामुळे व्यापार वाढण्यास आणि नवे रोजगार निर्माण करण्यास त्याची मदत होईल. राज्याचा महसूलही यामुळे वाढेल असे राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या संदेशात यादव म्हणाले की मध्य प्रदेशातील बाजारपेठा आता दिवस- रात्र सुरू राहतील. यामुळे व्यापार वाढेल आणि अर्थव्यवस्थेलाही नवीन पंख फुटतील. राज्यातील १६ मोठ्या शहरांमध्ये ही योजना लागू केली जाणार आहे.
रेस्टॉरंटस्, मॉल, हॉटेल्स, बिझनेस सेंटर, माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्राशी संबंधित कार्यालये यापुढे सतत सुरू राहतील. सूत्रांच्या म्हणण्यानुसार भोपाळ आणि इंदोर या दोन शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
अगोदर याच दोन क्षेत्रात योजना राबवली जाणार होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी आता सगळीकडेच तसे करण्यात यावे असे निर्देश दिले आहेत.