मुंबई – अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर स्टारर “बावल’चा बहुप्रतिक्षित ट्रेलर लाँच झाला आहे. दुबईतील एका कार्यक्रमादरम्यान हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. या ट्रेलरमध्ये दोघांची जोडी खूपच छान दिसत आहे. हा चित्रपट युद्धाच्या पार्श्वभूमीवर विणलेली प्रेमकथा आहे.
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या अधिकृत सोशल मीडियावर अकाऊंटवरून शेअर केलेल्या तीन मिनिटे आणि तीन सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये वरुण आणि जान्हवीची केमिस्ट्री खूपच छान दिसत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. प्राइम व्हिडिओने ट्विटरवर ‘बावल’चा ट्रेलर शेअर केला आहे. यासोबत, कॅप्शन लिहिले आहे, “प्रेम ते बावलपर्यंतचा प्रवास!” असं लिहलं आहे.
बवाल हा चित्रपट 21 जुलै रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आधी बवाल हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार होता. या चित्रपटात पहिल्यांदाच जान्हवी आणि वरुण यांची जोडी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.