अभिनव कला महाविद्यालयाचे वार्षिक प्रदर्शन राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये दि.२९/०१/२०२० ते दि.३१/०१/२०२० या तीन दिवसांमध्ये भरण्यात आले. या प्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रदर्शनाचे उद्घाटन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. 30 जानेवारी रोजी प्रसिद्ध फोटोग्राफर विकास शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. तसेच महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी त्यांची उपस्थिती दर्शवली. या प्रदर्शनामध्ये लावलेली सर्व चित्र विद्यार्थ्यांनी स्वतः काढली होती. तसेच 30 जानेवारी रोजी मनोज सकळे या प्रसिद्ध चित्रकारांचा लाईव्ह पोट्रेटचा डेमोही दाखवण्यात आला.
– राहुल केंगले,
कॉलेज रिपोर्टर,
अभिनव कला महाविद्यालयातील, पुणे