जोहानसबर्ग – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज एबी डीव्हिलियर्स पुनरागमन करणार, असे वृत्त सातत्याने प्रसिद्ध होत आहे. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे मत दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे.
डीव्हिलियर्स आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसतो. त्याचा हाच फॉर्म पाहून त्याच्याशी मंडळाने पुनरागमनाबाबत चर्चाही केली होती. मात्र, त्याचवेळी डीव्हिलियर्सने हा प्रस्ताव फेटाळला होता.
भारतात येत्या ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार असून, त्या स्पर्धेद्वारे डीव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे सांगितले जात होते.