मुंबई – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला . विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते.
या तैलचित्राचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र देऊन विशेष मागणी केली आहे.
प्रसिध्द संपादक, व्यंगचित्रकार, कलाकार, लेखक शिवसेना पक्ष व सामना वृत्तपत्राचे संस्थापक तसेच एक प्रखर हिंदुत्ववादी व्यक्तिमत्त्व अशी स्व.बाळासाहेब ठाकरे यांची ओळख अखंड हिंदुस्थानाला आहे. मराठी माती, मराठी माणसं यांच्या न्याय हक्कासाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचलं. जगाच्या pic.twitter.com/Bwk10dQ0cC
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) January 23, 2023
छगन भुजबळ यांनी पत्र देऊन नवीन संसद भवन येथील सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात यावे अशी मागणी केली होती. राज्यशासनाने केंद्र शासनाकडे मागणी करून त्याचा पाठपुरावा करावा असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेन याबद्दल माहिती दिली आहे.