Amir Khan: बॉलीवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानचा काही दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहात लग्न सोहळा पार पडला. जयपूरमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याला सिने इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. लग्नसोहळ्यानंतर मुंबईत आयरा आणि नूपुरचे भव्य रिसेप्शन देखील आयोजित करण्यात आले होते. यानंतर आता आमिर दुसऱ्या पत्नी किरण रावबरोबर ट्रीपवर गेला आहे. त्याचे काही फोटो किरण रावने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्यांचा मुलगा आझाद खान देखील दिसत आहे.
किरणने निसर्गाच्या सानिध्यातील हे फोटो शेअर करत “रोड ट्रिपिंग विथ सुंदरी” असे कॅप्शन देत दिले आहे. या फोटोमध्ये किरणने फिकट तपकिरी रंगाचा टर्टलनेक स्वेटर आणि कार्गो पँटमध्ये परिधान केली आहे. आमिरने जॅकेट आणि जीन्स तर मुलगा आझादने निळ्या रंगाचं टी-शर्ट आणि पँट घातली आहे, असं दिसत आहे. या ट्रिपसाठी तिघेही स्टायलिश लूकमध्ये दिसत आहेत .
अलीकडेच किरण राव पतीच्या पहिल्या पत्नीची मुलगी आयरा खान आणि जिम ट्रेनर नुपूर शिखरेच्या लग्नात सहभागी झाल्या होत्या दरम्यान, आमिर खान आणि किरण राव त्यांच्या १५ वर्षाच्या संसारानंतर २०२१ मध्ये वेगळे झाले. परंतु विभक्त झाल्यानंतरही ते एकत्र आनंदाने काम करताना दिसतात.
‘लापता लेडीज’ या चित्रपटाच्या किरण राव ह्या दिग्दर्शिका आहे. तर या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली आहे. ‘हा चित्रपट ‘लापता लेडीज’ नावाच्या बिप्लब गोस्वामी यांच्या पुरस्कार विजेत्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट १ मार्च २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.