छत्तीसगड – मोबाईलचे व्यसन या विषयावर अनेकदा बोलले जाते . मोबाईलच्या व्यसनामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येते. अनेकदा मोबाईलवर बोलता बोलता आपण एका जागेवरून चालत चालत दुसऱ्या जागेवर कधी पोहचतो याचे भान राहत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— 1000 WAYS TO DIE (@1000waystod1e) July 31, 2023
व्हायरल व्हिडिओमध्ये मोबाईल बोलत बोलत एक व्यक्ती इमारतीवरून पडल्याची घटना घडली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती इमारतीच्या सर्वात उंच ठिकाणी उभी असल्याचे दिसत आहे. असं करत असताना अचानक तो खाली उडी मारतो.
त्यानंतर, छताला पकडण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याला ते धरता येत नाही आणि तो रस्त्यावरील वाहनांमध्ये थेट खाली पडतो. हा नऊ सेकंदाचा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ५ लाख लोकांनी पाहिला आहे. लोक आता या व्हिडिओ प्रतिक्रिया देत आहे.