करोनाचे मुळ शोधण्यासाठी WHOचे पथक जाणार चीनला

जिनिव्हा – जागतिक आरोग्य संघटनेने चीन मध्ये जाऊन करोनाचा उगम नेमका कोठून कसा झाला याचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला असून त्यासाठी या संघटनेचे एक पथक जानेवारी महिन्यात चीनच्या वुहान येथे जाणार आहे.

वुहान शहरातून करोना जगभर पसरला असे सांगितले जात आहे. त्यासाठी वुहान शहरात जाऊन संशयित ठिकाणी हे पथक पहाणी करणार आहे. करोनाच्या मुळाशी जाणे हा या प्रयत्नाचा मुख्य उद्देश आहे असे जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने सांगण्यात आले आहे.

या कामात चीनचे अधिकारी सहकार्य करणार आहेत, पण त्यांच्या देखरेखेखाली हे काम केले जाणार नाही असे जागतिक आरोग्य संघटनेचे एक प्रतिनिधी डॉ. मायकेल रेयान यांनी सांगितले. करोनावर आता लसी येत आहेत त्याचे जगाने स्वागत करून उत्सव साजरा करावा पण हे करीत असताना पुढील तीन ते सहा महिने अधिक घातक आहेत हेही लक्षात ठेवावे अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

ज्या देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे त्याच देशांमध्ये करोनाचा फैलाव होण्याचा धोका अधिक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. अमेरिका आणि मेक्‍सिको या देशांची नावे त्यांनी या संबंधात घेतली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.