वॉशिंग्टन – अमेरिकेचे नवनियुक्ती अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी व्हाईट हाऊसचे असिस्टंट प्रेस सेक्रेटरी म्हणून मूळ भारतीय वंशाचे वेदांत पटेल यांची निवड जाहीर केली आहे. सध्या पटेल हे बायडेन यांच्या इनॉगरल कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते म्हणून काम पाहात आहेत.
बायडेन यांच्या प्रचार समितीतही पटेल यांनी काम पाहिले होते. नेवाडा आणि पाश्चिमात्य अमेरिकन राज्यात त्यांनी कम्युनिकेशन डायरेक्टर म्हणूनही बायडेन यांच्यासाठी काम केले होते. पटेल यांनी प्रमिला जयपाल या अमेरिकन संसद सदस्यासाठीही कम्युनिकेशन डायरेक्टर म्हणून काम केले होते.
पटेल हे मुळचे गुजरात राज्यातील आहेत. त्यानंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कॅलिफोर्निया प्रांतात झाले. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधील प्रसिद्धी विभागात काम करणारे ते तिसरे भारतीय ठरले आहेत. या आधी प्रिया सिंह यांनी व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी विभागात काम केले आहे.
त्यानंतर राजसिंग यांनीही तेथे काम केले आहे. व्हाईटच्या प्रसिद्धी विभागात काम करणाऱ्या 16 जणांची नावे बायडेन यांनी काल जाहीर केली त्यात पटेल यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.