मुंबई – बॉलिवूडमध्ये ज्यावेळी सुपरहिट आणि एव्हरग्रीन चित्रपटांचा विषय निघतो त्यावेळी शोले हे नाव समोर येत. आजही क्वचितच एखादी व्यक्ती असले ज्याला शोले चित्रपटाबाबत माहिती नाही. शोलेमधील प्रत्येक डायलॉग,प्रत्येक कॅरेक्टर आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.शोले या चित्रपटामुळे जय-वीरू ही जोडी मैत्रीसाठी ओळखली जाऊ लागली तर गब्बर एक क्रूर व्हिलन म्हणून सर्वांना परिचित झाला. अमजद खान यांना गब्बर सारखी डायलॉग डिलिव्हरीची प्रेरणा एका धोब्यापासून मिळाली होती याची देखील एक इंट्रस्टिंग स्टोरी आहे.
त्या काळी बॉलिवूडमध्ये निवडक व्हिलन होते ज्यामध्ये अमरीश पुरी हे नाव सर्वात मोठं होत तर डॅनी हे नाव दुसऱ्या क्रमांकावर होत. सुरुवातीला गब्बर हे पात्र डॅनी यांना देण्यात आले होते परंतु त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे त्यांना ते करता आले नाही. त्यानंतर अमजद खान यांना याबाबत विचारण्यात आले त्यावर त्यांनी लगेच होकार दिला. दिग्दर्शक आणि स्टोरी रायटरने त्यांना गब्बर हे पात्र जसेच्या तसे दिले होते फक्त त्याची बोली त्याची चाल कशी असेल हे सांगितले नव्हते.
अमजद खान यांनी गब्बरची डायलॉग डिलिव्हरी स्वतःच्या मनाप्रमाणे केली आणि सर्वांना ती खूप आवडली. अमजद खान यांच्या गावामध्ये एक धोबी होता त्याच्या बोलण्याचा अंदाज,काम करताना लोकांना बोलवण्याची शैली अमजद यांना चांगलीच आवडत असे. अमजद यांनी तीच स्टाईल शोलेमध्ये वापरली आणि सर्वांना गब्बरचा परिचय झाला. एका धोब्याच्या स्टाईलवरून अमजद खान यांनी शोलेमधील गब्बरला नवीन आकार दिला. रमेश सिप्पी यांना देखील अमजद खान यांनी सादर केलेला गब्बरप्रचंड भावला होता.