#Video : कितने आदमी थे…?

मुंबई – शोले चित्रपटात गब्बर सिंहची भूमिका साकारणारे अभिनेते अमजद खान यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त जाणून घेऊया अमजद खान यांच्या आयुष्याविषयी आणि त्याबद्दलच्या माहिती नसलेल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी…

  • अमजद खान यांचा अमजद खान यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९४९ रोजी हैदराबादमध्ये झाला होता. ते अभिनेते जयंत यांचे पुत्र होते. वांद्रा येथील सेंट टेरेसा स्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर अमजद यांनी आर. डी. नॅशनल कॉलेजमधून आपले पुढील शिक्षण पूर्ण केले.
  • रंगभूमीवरुन आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारे अमजद बालकलाकार म्हणून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकले होते. १९५७ साली रिलीज झालेल्या ‘अब दिल्ली दूर नहीं’ या सिनेमाते बालकलाकार म्हणून दिसले होते. यानंतर १९७३ साली आलेल्या ‘हिंदूस्तान की कसम’ या सिनेमात ते नायक म्हणून झळकले होते.

  • शोले म्हटलं की आपल्याला आठवतो चित्रपटातील गब्बर सिंग. गब्बर सिंगची भूमिका साकारून अमजद खान अजरामर झाले आहेत. त्यांनी ही भूमिका इतक्या प्रभावीपणे निभावली की, त्यांच्याशिवाय ही भूमिका दुसरं कुणी साकारूच शकत नाही, असं वाटायला लागतं.
  • शोले हा भारतामधील हिंदी भाषिक चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मानला गेलेला चित्रपट आहे. हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित होता.अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीव कुमार व अमजद खान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या.या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेने चित्रपटातील नायक प्रमाणे  चित्रपटाची खलनायकाच्या भूमिकेलाही तेवढेच महत्व मिळू लागले.
  • या चित्रपटातील ‘अरे ओ सांबा कितने आदमी थे’ हा डॉयलॉग आजही लोकांच्या मनात घर करून जातो. याशिवाय या चित्रपटातील ‘ये हात मुजे दे दे ठाकूर’ तसेच “सूअर के बच्चों!”……. या हिट डॉयलॉगने सिनेमाच्या पडद्यावर तो पहिल्यांदा दिसतो, तेव्हाच कानफटात मारल्यासारखे हे शब्दही आपल्या डोक्यात घुमतात. दरम्यान, शोले चित्रपटात त्यांनी साकारलेला ‘गब्बरसिंग’ हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी खलनायकांपेकी एक आहे.
  • अमजद खान शोले चित्रपटातील गब्बर सिंहच्या दमदार भूमिकेने जगभरात ओळख मिळवून दिली आणि ही भूमिका अजरामर झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.