– वंदना बर्वे
नवी दिल्ली – संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल आणि व्ही. मुरलीधरन हेही उपस्थित होते.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा करून अधिवेशनाच्या कामकाजाचा आढावा घेतला. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सुद्धा बिर्ला यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हेही उपस्थित होते. याशिवाय उर्जा मंत्री राजकुमार सिंग आणि वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल यांनीही चर्चा केली.
लोकसभाध्यक्षांनी रविवारी संसदेच्या लायब्ररीमध्ये सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलाविली आहे.