नवी दिल्ली – अलाहाबाद विद्यापीठाच्या वसतिगृहात झालेल्या बॉम्बस्फोटात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. विद्यार्थी वसतिगृहात स्वयंपाक करत असताना हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच जखमी विद्यार्थ्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा विद्यार्थी बॉम्ब का बनवत होता, हे अद्याप पोलिस तपासात निष्पन्न झालेले नाही.
पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेबाबत सहाय्यक पोलिस आयुक्तांनी सांगितले की, अलाहाबाद विद्यापीठाचा एमएचा विद्यार्थी प्रभात यादव हा पीसी बॅनर्जी वसतिगृहातील खोलीत बॉम्ब बनवत होता. त्यानंतर बॉम्बचा स्फोट होऊन त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. जखमी विद्यार्थ्याला एसआरएन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत आणखी एक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.