पुणे -जेजुरी (ता.पुरंदर) येथे येत्या गुरुवारी (दि.13) शासन आपल्या दारी व जेजुरी विकास आराखड्यातील कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पवार यांचा पुणे जिल्ह्यात पहिलाच मोठा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात कोण काय बोलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. जेजुरी येथे यापूर्वी 3 जुलै येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार होता. मात्र राजकीय घडामोडींमुळे हा कार्यक्रम आता येत्या गुरुवारी होणार आहे.
वाहतुकीसाठी बंद आणि पर्यायी मार्ग
- पहाटे 5ते सायं. 8 वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 आणि पुणे ते बारामती या मार्गावरील वाहतूक बंद
- जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक: सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड अवजड व इतर – वाहतूक पूर्णपणे बंद.
- त्यावरील वाहने ही नीरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुलामार्गे पुणे-सोलापूर महामार्गावरुन पुणे अशी वळविण्यात येणार आहेत.
- पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा.