नवी दिल्ली : नेमणुका आणि पदोन्नतीतील आरक्षणाबाबत काँग्रेस केंद्र सरकारविरोधात देशव्यापी मोहीम राबवणार आहे. पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात भाजप सरकारच्या असंवैधानिक भूमिकेविरोधात काँग्रेस 16 फेब्रुवारीपूर्वी देशव्यापी आंदोलन सुरू करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे
Congress to launch country-wide agitation programme before 16th February against 'unconstitutional stand of BJP government in Supreme Court' over reservation in promotions. pic.twitter.com/pbuU3iQ1n1
— ANI (@ANI) February 10, 2020
भाजप आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करतय: प्रियंका गांधी
नियुक्ती आणि पदोन्नतींमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी सोमवारी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. भाजप आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला. दलित आदिवासींवरील अत्याचारांविरोधात बनविलेल्या कायद्याला भाजप कमजोर करण्याचा प्रयत्न करतय. बाबासाहेबांनी दिलेले अधिकार भाजप दुर्बल करीत असल्याचे त्या म्हणाल्या.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले भाजपला राज्यघटनेतून आरक्षण हटवायचे आहे. आरएसएसचा आरक्षणाला विरोध आहे. भाजप आणि आरएसएसने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही आरक्षण संपवू देणार नाही. भाजप सरकाकरच्या काळात जनतेला बोलण्याचा अधिकार नाही. भाजप सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप करण्यात आला.