मक्का: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मक्केत आज सौदी अरेबियाने अरब नेत्यांची बैठक बोलावली आहे. अरब देशांचेहीं इराणशी वैर आहेच. पण अमेरिकेने इराणविरूद्ध युद्द पुकारल्यास त्याचा साऱ्या आखातावर विपरीत परिणाम होणार असल्याने त्यावर विचारविनीमय करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. सौदीचे राजे सलमान यांनी ही बैठक आयोजित केली आहे.
सध्या सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडी येमेनच्या विरोधात लढत आहे. सौदी राजांच्या निमंत्रणावरून आलेल्या राष्ट्रप्रमुखांना विमानतळावरच येमेनी बंडखोरांनी सौदीच्या विरोधात वापरलेल्या लष्करी वस्तुंचे दर्शन घडवले. त्यात येमेनी बंडखोरांकडून डागण्यात आलेली ड्रोन्स, तोफगोळे, आणि क्षेपणास्त्रांचे अंश याचा समावेश होता. येमेनच्या हौथी गनिमांना इराणकडून मदत केली जात असल्याचा सौदीचा आरोप आहे. त्यामुळे या मक्का बैठकीतून इराणला ठोस इशारा देण्याचा सौदीचा प्रयत्न आहे.