लॉस एंजेलिस – अमेरिकेच्या दक्षिण-पश्यिमेकडील अल्बुकर्क येथे एक हॉट एअर बलून कोसळून झालेल्या अपघातात किमान 5 जण ठार झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी आज ही माहिती दिली. हा हॉट एअर बलून विजेच्या तारांना चिकटल्याना ही दुर्घटना घडली.
यामुळे या परिसरातील वीजेचा पुरवठा काही तास खंडीत झाला होता. सुमारा 13 हजार नागरिकांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बलून कोसळल्यामुळे जखसी झालेल्यांपकी चौघांचा मृत्यू झाला आहे, असे अल्बुकर्कच्या पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. एका व्यक्तीला गंभीर जखसी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे, असेही त्या ट्विटमध्ये म्हटले होते.
मात्र नंतर या व्यक्तचा मृत्यू झाल्याचेही अधिकाऱ्यांनी नंतर सांगितले. या दुर्घटनेमध्ये मरण पावलेल्या सर्व व्यक्तींच्या कुटुंबीयांबद्दल आपल्या सहवेदना असल्याचेही पोलिसांनी सांगितले.