वॉशिंग्टन – परग्रहवासीय आणि उडती तबकडी याबाबत नेहमीच उलट सुलट बातम्या प्रसिद्ध होत असतात आता नुकत्याच एका सामाजिक कार्यकर्त्याने केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेला आला आहे 1980 मध्येच एका उडत्या तबकडीला सीआयएने ताब्यात घेतले होते आणि एरिया 51 ह्या प्रदेशामध्ये ही उडती तबकडी सुरक्षितपणे ठेवण्यात आली होती असा दावा या सामाजिक कार्यकर्त्यांने केला आहे सीआयए अधिकाऱ्यांना एका निर्मनुष्य वाळवंटामध्ये ही उडती तबकडी सापडली होती ती नंतर नेवाड्यातील एरिया 51 या ठिकाणी घेण्यात आली या ठिकाणी काही काळ ती उडती तबकडी ठेवण्यात आली होती.
नंतर ती तेथूनही हलवण्यात आल्याचा दावा एरिया 51 मध्ये काम करणाऱ्या काही अभियंत्यांनी केला होता एरिया 51 मध्ये जेव्हा ही उडती तबकडी आणण्यात आली तेव्हा अंड्याच्या आकाराची ही उडती तबकडी ओपन करण्यात त्यांना यश मिळाले नाही त्या अभियंत्यांनी खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांना ही तबकडी उघडता आली नाही म्हणून ती नंतर अन्यत्र हलवण्यात आली असा दावा करण्यात येत आहे संरक्षण खात्याशी संबंधित एका संस्थेत काम करणारे एरिक टेबर नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने हा दावा केला आहे.
एरीकचे काका सॅम 1980 च्या कालावधीमध्ये एरिया 51 मध्ये बांधकाम कंत्राटदार म्हणून काम करत होते त्यांनी ही माहिती एरिकला दिली 1980 च्या दशकामध्ये एरिया 51 मध्ये जी उडती तबकडी आणण्यात आली होती ती अंड्याच्या आकाराची होती आणि तिचा आकार एखाद्या जिपएवढा होता अशी माहिती एरिकच्या काकांनी दिली आहे एरिया 51 मधील अभियंत्यानी दीर्घ का प्रयत्न करून सुद्धा त्यांना या तथाकथित उडत्या तबकडीमध्ये घुसता आले नाही त्यामुळे नंतर हा प्रयत्न सोडून देण्यात आले नंतर ही उडती तबकडी येथून अन्यत्र हलवण्यात आली.