Actress Manjree – अभिनेत्री मंजरी फडणीस पुन्हा एकदा ‘फ्रीलान्सर पार्ट 2’ सोबत ओटीटीवर तिची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. खूप कमी लोकांना माहिती असेल की मंजरीने तिच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक साऊथ चित्रपट केले होते. ज्युनियर एनटीआर, अल्लारी नरेश यांसारख्या अनेक तेलुगू सुपरस्टार्ससोबत हिट चित्रपट केल्यानंतर, मंजरीने दक्षिण चित्रपट उद्योगाकडे पाठ फिरवली. याबाबत वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत मंजरीने कारण सांगितले आहे.
मंजरी म्हणाली की, ‘मला माहित आहे की दक्षिणेचे आणि विशेषतः हैदराबादचे प्रेक्षक माझ्यावर खूप प्रेम करतात. आजही तिथं गेल्यावर मला ते प्रेम जाणवतं. पण मी बराच वेळ वाट पाहिली. मला माहित नाही काय झाले, मला साऊथच्या चित्रपटात ज्या प्रकारचे काम करायचे होते तसे करण्याची संधी मिळाली नाही.आता मी ‘फ्रीलांसर 2′ साठी खूप उत्सुक आहे. मोहित खूप सपोर्टिव्ह आहे मोहित रैनासोबत ‘फ्रीलान्सर’मध्ये काम करण्याचा अनुभवही मंजरीने सांगितला. ती पुढे म्हणाली,’मला मोहितसोबत काम करायला खूप आनंद झाला. एक चांगला को-स्टार असण्यासोबतच तो एक चांगला माणूसही आहे. मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे.’
‘द फ्रीलांसर’ या वेब सीरिजचा पहिला भाग काही काळापूर्वी हॉटस्टारवर रिलीज झाला होता, आता त्याचा भाग 2 लवकरच सुरू होणार आहे. ‘फ्रीलान्सर’ची कथा प्रसिद्ध लेखक शिरीष थोरात यांच्या ‘अ तिकीट टू सीरिया’ या पुस्तकातून प्रेरित आहे. या मालिकेत मोहित रैना अविनाश कामथची भूमिका साकारत आहे.