पुणे – ऑडी चालकास पत्ता विचारल्याचा राग येऊन त्याने वकिलाच्या पायावर गाडी घालून पलायन केले. ही घटना जंगली महाराज रस्त्त्यावर हॉटेल सुभद्राजवळ घडली. या प्रकरणी ऍड. विशाल सोनवणे (वय 42, रा. धानोरी) यांनी ऑडी कार एमएच 14 आरएफ 6685 च्या चालकाविरुद्ध तक्रार दिली आहे.
ऍड. सोनवणे काही कामानिमित्त जंगली महाराज रस्त्यावर आले होते. त्यांनी ऑडी कारजवळ थांबलेल्या व्यक्तींना पत्ता विचारला. यावर आरोपींनी “तुम्ही कोणाला पत्ता विचारता, आम्ही ऑडी चालवणारे लोक आहोत’ असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली. ऍड. सोनवणे रस्त्यावर खाली पडले असता, आरोपी कारमध्ये बसून निघून गेले. यावेळी त्यांच्या पायावरुन गाडीचे चाक गेले. या प्रकरणाचा तपास डेक्कन पोलीस ठाण्याचे हवालदार सुपेकर करत आहेत.