“तुमच्या नावाचा एक ब्रॅंड ओळखला जावा’

चिंबळी  – स्वतःची ओळख करून घ्या, त्यानुसार कार्यक्षेत्र निवडा आणि निवडलेल्या कार्यक्षेत्रात कार्यक्षम व प्रतिभावंत व्हा, म्हणजेच समाजात तुमचा नाव एक ब्रॅंड म्हणून ओळखले जावे, असे प्रतिपादन मोटिवेशनल स्पीकर आणि वर्ल्ड इम्पॉवर कंपनीचे डायरेक्‍टर अक्षय व्यवहारे यांनी केले.

चिंबळी फाटा येथील श्री समर्थ स्कूल आणि कॉलेजमध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी व्यवहारे बोलत होते. याप्रसंगी श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अध्यक्ष शिवाजी गवारे, संस्थेचे सचिव विद्या गवारे, मुख्याध्यापिका प्राचार्य अनिता टिळेकर उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.