केरळमधील कोझिकोडमध्ये राहणाऱ्या एका ट्रान्सजेंडर जोडप्याच्या घरी लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे. जिया पावल (21) आणि जहाद (23) या जोडप्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आई-वडील झाल्याची गोड बातमी शेअर केली आहे. या जोडप्याला मार्च महिन्यात पहिल्या अपत्याची अपेक्षा आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते एकत्र राहत असल्याची माहिती जिया आणि जहादने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिली.
View this post on Instagram
या जोडप्याने सांगितले की, ‘जेव्हा आम्ही तीन वर्षांपूर्वी एकत्र राहू लागलो तेव्हा आम्हाला वाटले की, आमचे जीवन इतर ट्रान्सजेंडरपेक्षा वेगळे असावे. बहुसंख्य ट्रान्सजेंडर जोडप्यांना समाज तसेच त्यांच्या कुटुंबाकडून बहिष्कृत केले जाते. शास्त्रीय नृत्य शिक्षिका जिया पावल म्हणाल्या, आम्हाला एक मूल हवे होते, जेणेकरून या जगात आम्ही राहलो नाही तरी आम्ही काहीतरी मागे ठेवू शकू.’
जिया म्हणाली की, ‘ट्रान्स मॅन आणि ट्रान्स वुमन बनण्याचा आमचा प्रवास सुरूच राहणार आहे. ट्रान्स वुमन बनण्यासाठी मी अजूनही हार्मोन्सवर उपचार घेत आहे. प्रसूतीनंतर सहा महिने किंवा एक वर्षानंतर, जहाद ट्रान्स मॅन होण्यासाठी पुन्हा उपचार सुरू करेल.’
जिया पावल ही कोझिकोडची रहिवासी आहे. तर जहाद हा तिरुअनंतपुरमचा आहे. प्रसूती रजेवर जाण्यापूर्वी तिने अकाउंटंट म्हणून काम केले. त्यांची ट्रान्सजेंडर ओळख समजल्यानंतर दोघांनीही त्यांचे कुटुंब सोडले.
जिया पावलने सांगितले की, ‘खूप विचार केल्यानंतर तिने मूल होण्याचा निर्णय घेतला. ती पुढे म्हणाली, “जहाद यांनी आधीच दोन्ही स्तन काढून टाकले होते आणि आम्ही दोन्ही संप्रेरक उपचार घेऊन पुढे जात आहोत. तिला कोझिकोडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉक्टरांची मदत मिळाली, जिथे जहाद पुढच्या महिन्यात तिच्या मुलाला जन्म देणार आहे.’ जियाने सांगितले की, डॉक्टरांनी आम्हाला गर्भधारणेच्या प्रक्रियेबद्दल जास्त खुलासा न करण्यास सांगितले आहे. जहादने दोन्ही स्तन काढून टाकले असल्याने आम्ही बाळाला वैद्यकीय महाविद्यालयातील ब्रेस्ट मिल्क बँकेतून दूध पाजण्याची आशा करतो.’
जियाच्या या इंस्टाग्राम पोस्टवर आतापर्यंत 20 हजारांहून अधिक लाईक्स आणि 800 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. या जोडप्याचे अभिनंदन करताना यूजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.