IND vs NED 2022 – भारतीय संघाने स्पर्धेतील सलग दुसऱ्या सामन्यात जिंकला आहे. भारताने २३ ऑक्टोबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४ गडी राखून प्रभाव केला. तर आज नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने ५६ धावांनी बाजी मारली. या विजयासह भारताने सुपर-१२ गट-२ मध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. या सामन्यादरम्यान स्टँड्समध्ये अशी गोष्ट पाहायला मिळाली ज्याने मैदानातील सर्वच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
#INDvsNED | भारताचा विजय! नेदरलँड्सचा पराभव करत गुणतालिकेत अव्वल
सामन्यात ( IND vs NED ) नेदरलँड्सचा संघ फलंदाजी करता असताना स्टँड्समध्ये एका मुलाने त्याच्या प्रेयसीला गुडघ्यावर बसून लग्नाची मागणी घातली. यानंतर त्या मुलीने मुलाच्या मागणीला होकार दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी प्रेक्षकांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला. मुलगा आणि त्याची प्रेयसीही अत्यंत आनंदी दिसत होते. याचा विडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
टीम इंडियाने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या सुपर-१२ च्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा ( IND vs NED ) ५६ धावांनी पराभव केला. भारताने स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना नेदरलँड्ससमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात नेदरलँड्स संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १२३ धावाच करू शकला.
विराटचं सलग दुसरं अर्धशतक
विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात शानदार ८२ धावांची खेळी खेळली होती. त्याच खेळीची पुनरावृत्ती करताना विराटने नेदरलँडविरुद्धही ( IND vs NED ) ४४ चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावांची खेळी केली. विराटने प्रथम रोहितसोबत तिसऱ्या गड्यासाठी ७३ आणि सूर्यकुमार यादवसोबत ९५ धावांची भागीदारी केली.