नवी दिल्ली ,वृत्तसंस्था
बिहारची राजधानी पाटणाच्या दिवाणी न्यायालयात अचानक कमी तीव्रतेचा स्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत एक हवालदार जखमी झाल्याचे वृत्त आहे. असे सांगण्यात येत आहे की, हा बॉम्ब पुरावा म्हणून न्यायालयात आणण्यात आला होता, जेणेकरुन या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांना दाखवता येईल. मात्र त्याचवेळी बॉम्बचा स्फोट झाल्याने सर्वत्र घबराट पसरली. या घटनेत बॉम्ब घेऊन आलेला पोलीस कर्मचारी स्वत: जखमी झाल्याचे दिसून आले.
Patna, Bihar | ASI Kadam Kuwan Madan Singh's right hand injured. However, no other injured persons reported: SSP Patna, Manavjit Singh Dhillon
— ANI (@ANI) July 1, 2022
ही घटना घडली तेव्हा हा बॉम्ब पुरावा म्हणून न्यायालयात आणल्याचे अनेकांना माहीत नव्हते. बॉम्बचा स्फोट होताच तेथे गोंधळ उडाला. लोकांना वाटले की काहीतरी मोठी घटना घडली आहे.या घटनेत अन्य कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. पटनाचे एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांनी ही माहिती दिली आहे.
बॉम्बस्फोटात एक एएसआय जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, आगमकुवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक कदम कुवान मदन सिंग आज न्यायालयात पुरावा म्हणून दाखवण्यासाठी बॉम्ब घेऊन आले होते. पण बॉम्बचा स्फोट झाला. या घटनेत पोलीस कर्मचारी स्वत: जखमी झाला. त्यांना तातडीने पीएमसीएचमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. कोर्टात पुरावा म्हणून बॉम्ब दाखवण्यासाठी जखमी एएसआय तेथे पोहोचला होता. मात्र फिर्यादी कार्यालयातच बॉम्बचा स्फोट झाला. सुदैवाने या बॉम्बची क्षमता कमी होती, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती.