सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेक कंपन्यांचे कामकाज ऑनलाईन सुरु आहे. सगळेच नाही मात्र निम्मे कर्मचारी घरुन काम करताना दिसत आहेत. या काळात अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली तर अनेकांना नव्या नोकरीची संधी मिळाली. या नव्या नोकरीच्य़ा किंवा प्रत्येकच नोकरी मिळवण्याचा पहिला टप्पा म्हणजे मुलाखत. लॉकडाऊनमुळे संपर्क टाळण्यासाठी अनेक कंपन्यांनी त्यांच्या नव्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर ही नव्या पद्धतीची मुलाखत देण्यासाठी आपली तयारी असायला हवी….
तुमचा सीव्ही कितीही चांगला असला तरी तुमची कार्यक्षमता पडताळून पाहण्यासाठी अनेक लहान लहान ट्रिक्स मुलाखतकार वापरतात. त्यात तुमची काम करण्याची खरंच इच्छा आहेका?हे प्रकर्षाने तपासून पाहतात. त्यामुळे तुम्ही त्या कंपनीबाबती सगळी माहिती निदान वाचून ठेवावी. कंपनीचे प्रेगेक्ट्स, कंपनीला मिळालेले पुरस्कार त्यांच्या बेवसाईटवरुन वाचून घ्यावी.
मुलाखत देताना प्रश्न विचारणं हे तुम्ही ती नोकरी करण्यासाठी प्रमाणिकपणे प्रयत्न करत आहात. हे दाखवण्याचा सोपा मार्ग आहे. त्यामुळे संवादच नाही तर संभाषणात्मक मुलाखत देण्याचा प्रयत्न करा.
मुलाखत देताना तुमचं पहिलं इंप्रेशन प्रचंड गोष्टी नमुद करुन जातं. त्यामुळे तुमचा पेहराव हा नॉर्मल असावा. जास्तीत जास्त भडक कपडे परिधान करु नये.
तुम्ही ऑनलाईन मुलाखत देताना तुमचा कॅमेरा अँगल चेक करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या डोळ्याच्या रेषेच कॅमेरा फीट केलेला असावा. अन्यथा तुमची बॉडीलँग्वेजवर त्याचा परिणाम होईल आणि मुलाखतकाराला चुकीचा संदेश जाऊ शकतो.
शेवटची आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही कॅमेऱ्यात नीट दिसत आहात की नाही, तुमचा आवाज नीट समोरच्या व्यक्तीला जातो आहे की नाही हे तपासून पाहणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे यानंतर मुलाखतीसाठी तयारी करताना या बारिकसारीक गोष्टीचं पालन नक्की करा.