ठाणे – एमआयएम पक्षाचा भिवंडीचा प्रमुख खलिद गुड्डु आणि त्याच्या भावाच्या खासगी कार्यालयावर पोलिसांनी घातलेल्या छाप्यात अनेक बोगस रेशन कार्डे आणि आधार कार्डे आढळून आली आहेत.
खलिद गुड्डू आणि त्याचा भाऊ हे दोघेही सध्या खंडणी मागीतल्याच्या कारणावरून सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावरील आरोपांच्या अनुषंगांने त्यांच्या कार्यालयावर छापा घालण्यात आला होता त्यावेळी ही बोगस आधार व रेशन कार्डे सापडली.
एकूण 30 रेशन कार्डे आणि 30 आधार कार्डे मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही बोगस असल्याची खातरजमा संबंधित अधिकाऱ्यांकडून करून घेण्यात आल्याचेही पोलिसांनी दिली. निवडणुकीसाठी ही कार्डे तयार करण्यात आल्याची कबुली गुड्डू याने दिल्याचेही झोन 2 चे डीसीपी राजकुमार शिंदे यांनी सांगितले.