पिंपरी – महिलेचा अश्लील व्हिडीओ आणि तिच्या बहिणीचा फोटो तिच्या नातेवाइकांच्या मोबाइलवर पाठवून महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार सोमवारी (दि. 5) रात्री साडेनऊ वाजता भोसरी येथे घडला आहे. याबाबत पोलिसांनी व्हिडीओ पाठवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
हसन सादिक हुसेन कांसीवाला (वय 23, रा. अंधेरी, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीचा अश्लील व्हिडीओ काढून त्याच्या व्हाटसऍपवर पाठवण्यात सांगितले. फिर्यादीने तो व्हिडीओ आरोपीच्या मोबाइलवर पाठवला असता आरोपीने फिर्यादी महिलेचा अश्लील व्हिडीओ आणि तिच्या बहिणीचा फोटो महिलेअच्या नातेवाइकांच्या मोबाइलवर पाठवून तिचा विनयभंग केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.