बंगळुरु- कर्नाटकचे काँग्रेस आमदार बी. नारायण राव यांच कोरोनामुळे निधन झाले आहे. बंगळुरुतील खासगी रुग्णालयात त्यांंनी अखेरचा श्वास घेतला. 1 सप्टेंबरला यांचा कोरोनाचा रिपोर्ट पाॅसिटीव्ह आला त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कोरोनाच नाही तर त्यांना अनेक आजारांनी ग्रासले होते. मल्टी- ऑर्गन बिघाडामुळे त्यांना त्रास होऊ लागला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं समजतंय. त्यामुळे कर्नाटकच्या काँग्रेसला धक्का बसलाय.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. त्याची लागण फक्त सामान्यांनाच नाही तर आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणेलाही फटका बसला आहे.