- किरकोळ बाजारात डझनाचा दर 70 ते 80 रुपये
- एका नगासाठी मोजावे लागणार 6.5 ते 7 रुपये
पुणे – करोना पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती वाढावी म्हणून अंडी खाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी दिवसेंदिवस ग्राहकांकडून अंड्यांना मागणी वाढत आहे. यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात दर चांगलेच वाढले आहेत.
किरकोळ बाजारात डझनाचा दर 70 ते 80 रुपये झाला आहे. तर एका नगाची किंमत 6.5 ते 7 रुपयावर गेली आहे. करोनामुळे मागणी कायम राहणार असल्याने आणखी दोन महिने ग्राहकांना अधिकच्या दराने अंडी खरेदी करावी लागणार असल्याचे व्यापारी व पुणे जिल्हा बॉयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी सांगितले
परदेशी म्हणाले, नेहमीच्या तुलनेत मागील पंधरा दिवसांत 20 ते 30 टक्क्यांनी अंडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात गावरान अंडीच्या शेकड्याच्या दरात 100 ते 120 रुपयांनी वाढ झाली. तसेच इग्लिश अंड्यांच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली.