नवी दिल्ली – देशातील एकूण करोना रुग्णांच्या 60 टक्के रुग्ण हे केवळ पाच राज्यांमधील आहेत. एकट्या महाराष्ट्रातील 23 हजार पेक्षा अधिक आणि आंध्र प्रदेशमधील 10 हजार रुग्णांचा त्यात समावेश आहे.
आजच्या दिवसाला देशभरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 9 लाख 19 हजारांपेक्षा अधिक आहे.
एकूण सक्रिय रुग्णांपैकी 74 टक्के रुग्णसंख्या ही सर्वाधिक बाधित 9 राज्यांमधून आहे. एकूण सक्रिय रुग्ण संख्येपैकी 49 टक्के रुग्णसंख्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथील आहे.
सरासरी पाहता महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे अडीच लाखांपेक्षा अधिक तर कर्नाटक आणि आंध प्रदेश येथे प्रत्येकी 97 हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या आहे.
गेल्या 24 तासांत एकूण 1,172 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापैकी काल 32 टक्के म्हणजे 380 मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली तर कर्नाटकमध्ये 128 आणि तामिळनाडूमध्ये 78 मृत्यूंची नोंद झाली. एकूण मृत्यूंपैकी, 69 टक्के रुग्णांचे मृत्यू हे महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि आंध्रप्रदेश या पाच राज्यांमध्ये झाले आहेत.