पुणे – शहरात करोनाचा संसर्ग पुन्हा झापाट्याने वाढू लागला आहे. त्यातच लक्षणे दिसल्यास स्वॅब चाचणी कोठे करायची, हा पहिला प्रश्न गरीब आणि सर्वसामान्यांसमोर उभा राहतो. श्रीमंत किंवा ज्यांना परवडू शकते, अशा व्यक्ती खासगी लॅब किंवा रुग्णालयांमध्ये चाचणी करून घेतात. मात्र, सर्वसामान्य व्यक्तींचे काय? दरम्यान, शहरातील 16 ठिकाणी महापालिकेचे स्वॅब सेंटर असून, याठिकाणी मोफत चाचणी केली जाते. तसेच संशयीत व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्या व्यक्तीला कसे उपचार दिले जातात, कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत दैनिक प्रभातकडून सविस्तर माहिती देण्यात येत आहे.
शहरातील येथे करोना चाचणी केली जाते –
औंध – खेडेकर हॉस्पीटल, भवानी पेठ – सावित्रीबाई फुले स्कूल स्वॅब सेंटर , बिबवेवाडी – गंगाधाम फायरब्रिगेड स्वॅब सेंटर आणि अप्पर इंदिरानगर बस डेपो स्वॅब सेंटर, धनकवडी-सहकारनगर – शरद पवार भाऊ उद्देशीय हॉल , ढोले-पाटील रोड – महात्मा फुले स्कूल स्वॅब सेंटर, हडपसर-मुंढवा- बनकर स्कूल स्वॅब सेंटर, कसबा- विश्रामबाग – सणस हॉस्टेल (सीसीसी), बाबुराब सणस स्कूल, मंगळवार पेठ, कोंढवा-येवलेवाडी-दरेकर स्कूल , कोथरूड-बावधन – अण्णासाहेब पाटील स्कूल, के राऊत हॉस्पिटल, केळेवाडी, नगररोड- वडगावशेरी-रक्षकनगर खराडी सीसीसी,
शिवाजीनगर-घोलेरोड-सावित्रीबाई फुले हॉल, जनवाडी, सिंहगड रोड – सिंहगड हॉस्टेल सीसीसी आणि पू.ल.देशपांडे उद्यान, वानवडी-रामटेकडी-विलासराव देशमुख क्रिडा प्रबोधनी, वारजे-कर्वेनगर – एसएनडीटी कॉलेज स्वॅब सेंटर आणि बारटक्के हॉस्पीटल, वारजे माळवाडी, येरवडा-धानोरी अण्णाभाऊ साठे हॉल, येरवडा , डॉ. नायडू हॉपीटल डॉ. नायडू हॉपीटल.
रुग्णालयाच्या माहितीसाठी डॅशबोर्ड डाऊनलोड करा…
करोनासाठी शहरातील कोणत्या रुग्णालयात उपचार मिळतील. त्यामध्ये महापालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालयात किती रुग्णसंख्या आहे. सध्या, उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर बेड्स किती आहे याची सर्व माहिती एका ऍपवर मिळू शकेल. तसेच सर्व रुग्णालयांचे संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यामुळे फोनवरून याची माहिती तात्काळ उपलब्ध होऊ शकते. यासाठी नागरिकांनी प्ले स्टोअरमध्ये जावून सीसीसी (ccc App) टाईप केल्यावर हे ऍप येईल. ते डाऊनलोड करून ओपन केल्यावर सबमीट आणि स्कीप टू डॅशबोर्ड, असे दोन ऑप्शन स्क्रीनवर येतात. त्यामध्ये “स्कीप टू डॅशबोर्ड’ वर क्लिक करताच सर्व माहिती स्क्रीनवर उपलब्ध होईल.