नवी दिल्ली/लेह – पॅन्गोंग त्सोवर पुन्हा एकदा भारत आणि चीनच्या फौजा आमने सामने ठाकल्या आहेत. दोन्ही फौजा फायरिंग रेंजमध्ये असल्यामुळे कमालीचा वातावरणात तणाव असल्याचे सूत्रांनी सांगितले.
29 ऑगस्टच्या मध्यरात्री चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याची पुनरावृत्ती 31 ऑगस्टच्या मध्यरात्रीही झाली.
पॅन्गोंग त्सो येथे चीनच्या सैन्याचा हा प्रयत्न भारतीय जवानांनी दाखवलेल्या तत्परतेने हाणून पाडण्यात आला. पॅन्गोंग त्सो येथे पहिल्यांदा झालेल्या धुमश्चक्रीच्या पार्श्वभूमीवर चिशूल येथे लष्कराच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्यात झालेल्या चर्चेत कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.
ब्लॅक टॉप येथे जमलेले जीनी सैनिक हे भारतीय जवानांच्या गोळीबाराच्या टापूत आहेत. हा पट्टा पॅन्गोंग तलावाच्या दक्षिण किनाऱ्यापासून स्पॅग्गूर गॅप पर्यंत दोन्ही बाजूचे जवान आमने सामने आहेत. दोन्ही देशांच्या सीमांवर काहीशे मिटर अंतरावर दोन्ही देशाच्या फौजा आमने सामने आल्या आहेत. दोन्ही देशांच्या जवानांची शस्त्रसज्ज वाहने आणि शस्त्रास्त्रे तैनात करण्यात आली आहेत. रणगाडे आणि क्षेपणास्त्रेही दोन्ही बाजूंनी तैनात करण्यात आली आहेत.
मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पूर्व लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेतला. चीनने कोणतीही आगळीक केल्यास आक्रमकपणे मुकाबला करण्याचे अधिकार भारतीय लष्कराला देण्यात आले. पॅन्गोंग तालवाच्या सभोवतालच्या स्थितीची माहिती बैठकीत संरक्षण मंत्र्यांना देण्यात आली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या भागात अधिकची शस्त्रसज्जता करण्यात आली. तेथे आणखी रणगाडे तैनात करण्यात आले.
भारतीय जवान तुलनेने उंचावरील स्थानावर असल्याने त्यांची बाजू तुलनेने भक्कम आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल, संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत, लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे, हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांचा समावेश होता.
भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणाहून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न चीनच्या सैन्याने 30 तारखेला दोनदा केला. मात्र तो सपशेल अपयशी ठरला. भारतीय जवानांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही.
ब्रिगेडीयर पातळीवरची बैठक
वातातवरणातील कमालीचा तणाव कमी करण्याच्या हेतूने ब्रिगेड कमांडर पातळीवरची बैठक बुधवारी उशीरापर्यंत सुरू होती. मात्र त्यातील चर्चेचा तपशील दोन्ही बाजूकडून जाहीर करण्यात आला नाही.