पुणे – पुर्व वैमनस्यातून एकास सराईत गुन्हेगारासह चौघांनी जबर मारहाण केली. ही घटना अप्पर बिबवेवाडी येथे सोमवारी घडली. पोलिसांनी सराईत गुन्हेगार बाळा गाडे याच्यासह चौघांविरुध्द बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी इरफान शेख (24, रा.सुप्पर बिबवेवाडी) हा त्याचा भाऊ चॉंदला दुचाकीवरुन घेऊन चालला होता. रस्त्यात चॉंला त्याचा मित्र भेटल्याने तो त्याच्याशी बोलत उभा होता. इतक्यात आरोपींनी तेथे येऊन जुनी भांडणे उकरुण काढली.
त्यांच्यात वाद वाढल्यावर आरोपींनी जमीनीवर पाडून त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर चॉंदच्या डोक्यावर मानेवर, हातावर व पोटावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक पावसे करत आहेत.