बेल्हे -पेमदरा (ता. जुन्नर) येथील चोळी मायनर धरण यंदा दमदार पावसामुळे 100 टक्के भरले आहे. धरण भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. शनिवारी (दि. 1) जलपूजन आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले.
पठार भागावर दमदार पाऊस झाल्याने येथील सर्व नाले, बंधारे 100 टक्के भरले आहेत, अशी माहिती सरपंच रंगनाथ बेलकर व प्रशांत दाते यांनी दिली. धरणातून पेमदरा, भोसलेवाडी, कारेवाडी, शिंदेवाडी या गावांसाठी पाणी पुरवठा होतो. पेमदरा गावासाठी पाण्याची सोय होते.
याप्रसंगी आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, बाळासाहेब खिलारी उपस्थित होते.