कोल्हापूर: सरकार आता पडेल, या भीतीने महाविकास आघाडीतील घटकांना झोप येत नसेल. त्यामुळे त्यांना झोपेच्या घेण्याची गरज आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
तुम्ही सरकार चालवा, आम्ही ते पाडण्यासाठी प्रयत्न करणार नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. मध्यप्रदेश, राजस्थान नंतर भाजपने मिशन महाराष्ट्र हाती घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, त्यांनी ही भेट राजकीय नसल्याचे म्हटले आहे.
दूध दरवाढीसाठी भाजप करणार आंदोनल
कोरोनामुळे सामान्य लोकांचे जगणे कठीण झाले. महागाई वेगाने वाढत आहे. देशात पेट्रोल आणि डिझेल’चे दर देखील वाढले आहेत. यापूर्वी काँग्रेसने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले होते.
दरम्यान, आता भाजप मित्रपक्षांना घेऊन दूध दरवाढीसाठी आंदोलन करणार आहे. 1 ऑगस्टला हे आंदोलन असणार आहे. याबाबत माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “डेअरीना प्रतिलिटर दहा रुपये देण्याची आमची मागणी आहे. आमचं आंदोलन हिंसक नसेल, अधिकाऱ्यांना दूध भेट देणे आणि परवानगी मिळाली तर देवाला दूध अर्पण करणे, असे स्वरूप असेल”