जुन्नर (वार्ताहर) -जुन्नर तालुक्यात बुधवारी (दि. 8) करोनाबाधितांची संख्या 17ने वाढल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले धनगरवाडी, धालेवाडी, वारूळवाडी व नारायणगाव येथील एकूण 17 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 46 झाली असून करोनावर 56 जणांनी यशस्वीरीत्या मात केली आहे.
तर औरंगपूर, मोकसबाग व पिंपळगाव तर्फे नारायणगाव (वाणीमळा) येथील प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटरमध्ये बुधवारी (दि. 7) 36 संशयित रुग्णांचे नमुने घेण्यात आले असून आजअखेर 982 संशयितांचे स्वॅब येथे घेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.स
ध्या तालुक्यात 3854 व्यक्ती क्वारंटाइन असून तब्बल 356 टीम सर्व्हेक्षणाचे काम करीत आहेत. दरम्यान नारायणगाव परिसरात रुग्णांची संख्या अचानक वाढल्यामुळे परिसर प्रतिबंधित घोषित करण्यात आला आहे.