फेसबुक आता वापरकर्त्यांना सतर्क करेल की जो लेख(कंटेंट) तुम्ही पोस्ट करत आहात तो जूना तर नाही ना आणि तरी देखील एखादा वापरकर्ता तीन महिने जूना लेख(कंटेंट) अथवा माहिती पोस्ट करत असेल तर त्याला त्वरित अॅलर्ट(चेतावणी) करण्यात येईल. सोशल माध्यमावरील प्लॅटफार्म असलेल्या फेसबुकने हे नवीन फिचर सुरू करणार आहे. जूनी माहिती किंवा बातमी पोस्ट करून लोकांमध्ये संभ्रम किंवा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी फेसबुकने हे पाऊल उचलले आहे. लवकरच हे फिचर सुरू होणार आहे.
नवीन फिचर नुसार जर कोणी वापरकर्ता 90 दिवसापूर्वीचा जूना लेख अथवा बातमी पोस्ट करत असेल तर त्यावेळी एक पाॅपअप नोटिफिकेशन दिसेल आणि त्यात संबंधित लेख अथवा बातमी तीन महिने जूना आहे असा मॅसेज दिसेल.
फेसबुक कंपनीने म्हटले आहे की, जून्या बातम्या किंवा माहिती पसरवल्याने होणारा गोंधळ लक्षात घेऊन हे फिचर (वैशिष्ट्य) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
फेसबुक फीड एंड स्टोरी विभागाचे उपाध्यक्ष जाॅन हेगेमैन यांनी म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांत आमच्या अंतर्गत संशोधन कार्यसंघाला असे आढळले की लेख लिहिण्याची व पोस्ट केल्याची वेळ ही लोकांना काय वाचावे, कोणावर विश्वास ठेवावा आणि संबंधित लेख कोणाशी व का शेअर करायचा हे ठरवण्यासाठी महत्वाची असते. या फिचरचा उद्देश लोकांना कोणता लेख समकालीन, विश्वासार्ह आणि महत्वपूर्ण आहे हे ओळखण्यात मदत करणे आहे.