नाशिक: नाशिक जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा वाढत असताना गेल्या 48 तासात दोन नवजात बाळांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे पालकांची धास्त वाढली आहे. या नवजात बाळांसाठी विशेष उपाययोजना करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वच वयोगटातील लोकांना करोनाची लागण होत असली तरी नवजात बाळांनाही कोरोनाने ग्रासलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
नाशिक जिल्ह्यात करोना रुग्णांचा आकडा 693 पर्यंत पोहोचला आहे. यात निफाडच्या विंचूर या ठिकाणच्या दोन दिवसांच्या बाळाला करोना झाला आहे. तर मालेगावमधील चंदनापुरीतील 10 दिवसांच्या चिमुरडीला कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या दोघांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षण नव्हती. तर जवळपास 33 जणांचा मृत्यू झाला आहे.