नाशिक – राज्यात करोनाचा हाहाकार वाढत असताना आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात करोनामुळे सहाव्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमधील हेड कॉन्स्टेबल साहेबराव झिप्रु खरे असे मृत्यू झालेल्या पोलिसांचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूमुळे पोलीस दलावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साहेबराव झिप्रु खरे हे नाशिक ग्रामीणमध्ये पोलीस हेडक्वार्टर पदावर कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती आणि आज त्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरातील पोलीस करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. राज्यात शुक्रवारी 24 तासांत 75 पोलीस करोनाबाधित झाले होते.
आता करोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या 531 झाली आहे. तर आतापर्यंत 6 पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईत 3, पुण्यात 1 आणि सोलापुरात आणि नाशिकमधील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.