आंबेठाण -चेष्टा मस्करीत एका 32 वर्षीय युवकास विहिरीत ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या युवकास पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भांबोली येथे घडली.
याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी (दि. 7) सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दिलीप गणपत घावटे (रा. शेलू, ता. खेड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. भांबोली गावात बाबाजी पडवळ यांची विहीर असून, या विहिरीत दिलीप घावटे यास चेष्टा मस्करीत योगेश प्रकाश पडवळ याने विहिरीत ढकलले.
मात्र, दिलीप घावटे यास पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मागर्दशनाखाली सुरू आहे.