सातारा : कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले ५ जण करोनाबाधित (कोव्हिड-19) असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या २६ झाली आहे.
त्यापैकी आता पर्यंत ३ रुग्ण मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर २ जणांचा मृत्यू झाला आहे.
तसेच २४ एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात २३ संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.