नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव पाहता जागतिक आरोग्य संघटनेने रमजानसंदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. ज्यामध्ये रमजान दरम्यान महत्वाच्या गोष्टींची काळजी घेण्यास नागरिकांना सांगितले आहे. तसेच काही मुस्लिम धार्मिक संघटना देखील मुस्लिम समाजाला आरोग्य विभागाच्या निर्देशाचे पालन करावे, धार्मिक पार्थनेच्या वेळी नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन केले आहे.
NEW: WHO interim guidance for safe #Ramadan in the context of the #COVID19 highlights public health advice for social and religious practices & gatherings during the month that can be applied across different national contexts
👉🏽 https://t.co/Zq2XQBS6FN#coronavirus pic.twitter.com/gZ2h6tRQb0
— World Health Organization (WHO) (@WHO) April 18, 2020
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे कि, रमजान महिन्यात नागरिकांना एकत्र येण्यास परवानगी दिली तर, कोरोनाचा वाढत असणारा धोका कमी करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करायला हवी. तसेच नागरिकांनी रमजान महिन्यात एकमेकांना अभिवादन करण्यासाठी छातीवर हात ठेऊन किंवा नमस्कार करण्याला प्रोत्साहन द्यावे.