रोम (इटली) : इटलीमध्ये अवघ्या दोन महिन्याची चिमुकली करोनामुक्त झाली आहे. तिला आणि तिच्या आईला 18 मार्चला करोना बाधेमुळे या दोघींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या चिमुरडीत आता ताप, सर्दी अथवा न्यमोनियाचा संसर्ग आढळून येत नाही. करोनामुक्त झालेली ही इटलतील सर्वात लहान मुलगी असल्याचे वृत्त तेथील स्थानिक दैनिकांनी दिले आहे. इटलीत गुरूवारपर्यंत 17 हजार 669 बळी नोंदवण्यात आले आहेत.