मुंबई – देशासमोर उभ्या असलेल्या करोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक, सिनेकलाकार, राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार पुढे सरसावले आहेत. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, वरूण धवन, सनी देओल, अजय देवगण, कार्तिक आर्यन, नाना पाटेकर यांनी करोनाशी लढा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यातच बॉलिवूडच्या किंग शाहरुख खानने पश्चिम बंगालला करोनाशी लढा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
दरम्यान, शाहरुख खानने हा सहभाग बघता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी या बॉलिवूडच्या किंग खानचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट केले आहे की,’शाहरुख आपले धन्यवाद, देशासमोर उभ्या असलेल्या करोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत केल्यमुळे लोकांच्या समस्या दूर करण्यात मदत होईल तुमच्या या मदत कार्यामुळे तुम्हाला आदर्श मानणाऱ्या देशातील अनेक लोकांना प्रेरणा मिळेल.’
मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानने आईपीएलमधील त्याचा फ्रेंचाइजी कोलकाता नाइट राइडर्सच्या माध्यमातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीला मदत केली आहे.