सीईओ प्रमोदकुमार सिंह यांचे नागरिकांना आवाहन
खडकी (प्रतिनिधी) – खडकी कॅन्टोमेन्टच्या वतीने सर्व खडकीकर नागरिकांना करोना आजारापासुन सुरक्षित राहण्यासाठी आवाहन करण्यात आले. खडकी कॅण्टोमेन्टचे मुख्याधिकारी प्रमोदकुमार सिंह यांनी खडकीकरांना याबबत आवाहन केले आहे. प्रत्येक नागरिकांनी लॉकडाउनच्या या काळात घरातच राहावे.
घराच्या बाहेर भाजी खरेदी.किराणा सामन घेण्यासाठी बाहेर पडत असाल तर छत्री घेऊन बाहेर पडा त्यामुळे आपोआप दोन जणांमध्ये अंतर ठेवले जाईल. सध्या उन्हाचा तडाखा असल्याने छत्रीचा असा दुहेरी उपयोग होईल असेही त्यांनी सांगितले आहे.
सध्याच्या वातावरणात आपल्याबरोबर इतरांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन खडकी कॅण्टोमेन्टच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी विलास खांदोडे.आर.व्ही.वायकर,निखिल साडे,बापु भालेराव,नरेश सारसर उपस्थित होते.