अहमदाबाद, – गुजरातमध्ये शनिवारी 46 वर्षीय करोनाबाधित महिलेचे निधन झाले. त्यामुळे त्या राज्यात करोनाने घेतलेल्या बळींची संख्या 4 इतकी झाली आहे. येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलेला करोनाची बाधा झाल्याचे दोन दिवसांपूर्वी समोर आले.
तिला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचाही त्रास होता. रुग्णालयात तिला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते. दुर्दैवाने तिचे प्राण वाचू शकले नाहीत. याआधी गुजरातमधील अहमदाबाद, सुरत आणि भावनगरमध्ये प्रत्येकी एका करोनाबाधिताचे निधन झाले. त्या राज्यातील बाधितांच्या संख्येने याआधीच पन्नाशी पार केली आहे.