भोपाळ : मध्य प्रदेशात सध्या सुरू असलेल्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत भाजपची केंद्रीय निवडणूक समिती बैठक सुरु आहे.
या बैठकीत राज्यसभेच्या उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहे. कॉंग्रेसचा राजीनामा दिलेले ज्योतिरादित्य सिंधिया बैठकीला हजेरी लावण्याची शक्यता आहे.
Delhi: Meeting of BJP Central Election Committee underway at party headquarters. https://t.co/630jP0aWho pic.twitter.com/0dOCNeeHp7
— ANI (@ANI) March 10, 2020
सिंधिया यांना भाजप राज्यसभेवर पाठवणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या बैठकीत सिंधिया यांचे नाव राज्यसभेसाठी जाहीर केले जाऊ शकते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, थावरचंद गहलोत, भाजपा संघटनेचे मंत्री बी.एल. संतोष, शाहनवाज हुसेन, विजया रहाटकर यांच्यासह पक्षाचे नेते या बैठकीत उपस्थित आहेत.
निवडणूक समितीच्या बैठकीनंतर संसदीय समितीची बैठक होणार आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे उपस्थित राहतील.