मेलबर्न : लेह कैस्परेक आणि हेली जेनसन यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने महिला टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात शनिवारी बांगलादेशचा १७ धावांनी पराभव विजय नोंदविला. हेली जेनसन सामन्याची मानकरी ठरली.
The comeback is complete 💪
New Zealand bowl out Bangladesh for 74 to win by 17 runs 👏#T20WorldCup | #NZvBAN
📝📽️ https://t.co/7XKkAyyIPh pic.twitter.com/qqj0YTVhjA
— T20 World Cup (@T20WorldCup) February 29, 2020
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या ९१ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव १९.५ षटकांत ७४ धावांवर संपुष्टात आला. बांगलादेशकडून फलंदाजीत निगार सुल्तानाने २१(२६), मुर्शिदा खातूनने ११(१४) आणि रितु मोनिने १०(२२) धावांची खेळी केली.
न्यूझीलंडकडून गोलंदाजीत हेली जेनसनने (४ षटकांत ११ धावा) आणि लेह कैस्परेकने (३.५ षटकांत २३ धावा) प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर, एमेली केर आणि सोफि डिवेइन यांनी प्रत्येकी १ विकेट घेत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने राचेल प्रीस्टच्या २५(३२), सुजी बेटसच्या १५(१४), सोफि डिवेइनच्या १२(१५) आणि मैडी ग्रीनच्या ११(१६) धावांच्या खेळीच्या जोरावर १८.२ षटकांत सर्वबाद ९१ धावा केल्या होत्या.
बांगलादेशकडून रितु मोनिने ४ षटकांत १८ धावा देताना सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर, सल्मा खटुन आणि रूमाना अहमदने प्रत्येकी १ विकेट घेतली.