पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरवासीयांवर लादण्यात येणारा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी दरवाढ अन्यायकारक आहे. हा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या अंतर्गत राजकारणामुळे आगामी आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता कर आणि पाणीपट्टी दरवाढ केली जाणार आहे. तो विषय सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यात आला आहे. मालमत्ताकर वाढीचा 2 लाख 54 हजार करदात्यांना, तर पाणीपट्टी दरवाढीचा 1 लाख 10 हजार नळ जोडधारकांना फटका बसणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तयार केलेल्या प्रस्तावानुसार करयोग्यमूल्य आणि भांडवलीमूल्य अशा दोन पद्धतीचा पर्याय दिला आहे. सर्वसामान्यांना याचा त्रास होणार असून, ही दरवाढ त्वरित रद्द करावी, अशी मागणी
केली आहे.