नगर – प्रभाग क्र. 6 मधील भिंगारदिवे मळा येथील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. संबंधित प्रशासनाने या भागात नवीन पाइपलाइन टाकावी अशा मागणीचे निवेदन उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना नगरसेविका वंदना ताठे दिले.
यावेळी अलका गायकवाड, कायबाई खंडागळे, संगिता बर्डे, कमल कासवर, प्रतिका शेलार, रेखा बर्वे, सुनीता गिते, चंद्रकला हराळे, राहुल पवार, अक्षय बारवकर आदी उपस्थित होत्या.
नगर परिषद असताना जुनी पिण्याच्या पाण्याची चार इंची पाइपलाइन आहे. या भागाचा विस्तार झपाट्याने होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. आता उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहे.
भविष्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. तरी आताच या परिसरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी भूतकरवाडी चौक ते भिंगारदिवे मळ्यापर्यंत 4 इंची पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने लवकरता लवकर उपयायोजना करावी, अशी मागणी करण्यात आली.